dc.description.abstract |
भारतात लोकगीतांप्रमाणेच लोककथांनाही अतिप्राचिन परंपरा लाभलेली आहे. मौखिक आविष्काराचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे "लोककथा" होय. लोकजीवनात लोककथांना विशेष महत्त्व आहे. लोककथा मौखिक पध्दतीने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित होत असते. लोककथा कथनामागची वेगवेगळी प्रयोजने आज आधोरेखित करता येतात. लोकांचे मनोरंजन करणे, विधीचा एक भाग असणे, संस्कृतीचा परिचय करून देणे, सांस्कृतिक इतिहास सांगणे अशी किती तरी प्रयोजने लोककथा कथनामागे असलेली आढळून येतात. या सगळ्यांबरोबर एक महत्त्वाचे प्रयोजन म्हणजे लोककथेतून नीति-अनीति विषयक शिकवण देणे. आशयानुसार कुळमी लोककथांचे अनेक प्रकार सांगता येईल. त्यांच्यात दैवतकथा, अद्भूतरम्यकथा, देवदेवता साहाय्यकथा, चातुर्यकथा असे वेगवेगळे कथाप्रकार आढळून येतात. या वेगवेगळ्या कथांतून दिसून येणाऱ्या मानवतेचा विचार या संशोधन लेखात करायचा आहे. |
en_US |