Abstract:
मराठी साहित्याला विज्ञानसाहित्याची परंपरा आहे. क्लिष्ट वाटणारे विज्ञान साध्या, सोप्या पद्धतीने सामान्य वाचकापर्चंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विज्ञानकथेची निर्मिती झाली. विसाच्या शतकात कालयंत्रापर्यंत सीमित असलेली कथा विविध संकल्पनांचा परामर्श घेऊन दाखल होऊ लागली. ह्याच कथांचे प्रतिनिधित्व डॉ. संजय ढोले ह्यांच्या कथा करतात. एकूणच विज्ञानाची विधायक आणि संहारक बाजू तितक्याच ताकदीने मांडण्याचा प्रवत्न लेखकाने केलेला आहे. संशोधक व संशोधनाची दुसरी भयावह बाजू त्यांच्या कथांतून ठळकपणे दिसते. 'खुजाबा' कथासंग्रहातील सर्व कथा आधुनिक शतकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. या कथांमधून आजचा काळ प्रतीत झाल्यामुळे कथा वास्तवाकडे झुकलेल्या दिसतात. विज्ञान हे सर्वसमावेशक असून वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग याबरोबरच वैज्ञानिक परिणामांचीही सखोल करणमीमांसा त्यांनी केली आहे.