Abstract:
पथनाट्य संहितालेखनाचा 'प्रेरणानिष्ठ' आणि 'आकृतीबद्धनिष्ठ' विचार हा सदर शोधनिबंधाचा गाभा राहिलेला आहे. पथनाट्य संहिता ही सादरीकरण सामग्री होय. सादरीकरणाच्या उद्देशानेच ती संहिता जन्म घेत असते आणि ती नुसती जन्म घेत नाही तर काही प्रेरणांच्या अनुषंगाने तिचा निर्मिती प्रवास घडत असतो. उद्बोधन , समाजप्रबोधन व परिवर्तन, राजकीय आणि सांस्कृतिक भान अशा त्या लेखनामागच्या प्रेरणा असतात. अशा पथनाट्य प्रेरणांचाच समर्पक विस्तार सदर शोधनिबंधाद्वारे केलेला आहे. वर्तमानातील छोटेखानी, दहा ते बारा मिनिटांच्या अवधीत आपला अपेक्षित विषय प्रेक्षकांसमोर परिणामकारकरित्या ठेऊन पुढे जाणाऱ्या पथनाट्याच्या आकृतीबंधाचे विश्लेषणही सदर विषय मर्यादेत केलेले आहे.