Abstract:
साक्षेपी संपादन हे उत्कृष्ट साहित्य निर्मितीतील एक महत्त्वाचे अंग आहे. मुळात ज्या साहित्यकृतीचे संपादन करावयाचे आहे त्या विषयाचे सखोल ज्ञान संपादकाला असणे आवश्यक असते. त्याच्या अनुषंगाने अन्य विषयांच्या वाचन, मनन आणि चिंतनाची जोडही देणे आवश्यक असते. त्यानंतर साहित्यकृतीचा नेमका परिणाम साधला जाण्यासाठी त्या साहित्यकृतीची मांडणी करता येणे अपेक्षित असते. मराठी साहित्य क्षेत्रात अशा अनेक उत्तम संपादकांची परंपरा आहे. पुढील लेखात 'एकट्याचे गाणे - शंकर रामाणी यांचे पत्रसंचित' आणि 'गोमंतकीय स्त्रीलिखित मराठी कविता' या संपादित ग्रंथाचा संशोधनात्मक दृष्टीने घेतलेला आढावा पाहता येईल.